Join Us

संपर्क 98 50 33 81 85 दैनिक साम्राज्य न्यूज चैनल प्रतिनिधीसाठी, जिल्हा प्रतिनिधी ब्यूरो चीफ, स्टेट हेड ,तसेच दैनिक साम्राज्यचे प्रतिनिधी बनण्यासाठी इच्छुकांनी संपर्क मुख्य संपादक सुखदेव जाधव मो. 98 50 33 81 85

उद्या वडगावमध्ये श्री पोटोबा महाराज देवस्थान,विश्व हिंदु परिषद व बजरंग दल यांच्या संयोजनातून श्रीराम मंदिर अक्षता मंगल कलश यात्राचे आयोजन

Responsive Ad Here

वडगाव मावळ,ता.१६: उद्या रविवार १७ डिसेंबर सकाळी ८ वाजता श्री पोटोबा महाराज देवस्थान, विश्व हिंदु परिषद व बजरंग दल तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटना यांचे संयोजनातून श्रीराम मंदिर अक्षता मंगल कलश यात्रेचे वडगाव मावळ येथ आयोजिन करण्यात आले आहे.
        दोन वर्षांपूर्वी संपूर्ण देशभरात श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्यातर्फे श्रीराम मंदिरासाठी ऐच्छिक निधी संकलन केले गेले होते. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या नगरीत श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्या सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यास अयोध्या येथून श्री राम मंगल अक्षता कलश उद्या रविवारी १७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी  ८ वाजता ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर  येथून मंगलमय पालखी मधून वाजत गाजत सुरुवात होणार आहे, त्यानंतर ग्रामदिंडी प्रदक्षिणा  होणार असून समरोप श्री पोटोबा महाराज मंदिरात सामूहिक श्रीराम भजन, महाआरती होऊन  प्रसादाचे वाटप होईल. येथे जवळपास ५०० वर्षाचा  संघर्ष केल्या नंतर श्री रामलल्ला विराजमान होत आहेत . तरी सर्वांनी कलशाचे दर्शन घेऊन वडगाव मधील सर्व सार्वजनिक गणेशउत्सव मंडळ यांनी अभियानात सहभागी होन्याचे आवाहन केले आहे.